बारामतीत नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 124 वी जयंती साजरी
पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली
बारामतीत नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 124 वी जयंती साजरी
पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली
बारामती वार्तापत्र
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन करून देशासाठी एक नवी दिशा दिली होती नेताजींची 124 वी जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आले सुभाष चौक बारामती येथे सालाबाद प्रमाणे ही जयंती साजरी करण्यात आली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी उपस्थित व्यापारी व नागरिक यांची संवाद साधला व या जयंती कार्यक्रमाचे कौतुक केले.
यावेळी स्टेशन रोड व्यापारी यांच्यावतीने दिलीप कुमार भोगीलाल शहा यांनी नामदेवराव शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी विकासशेठ शहा, राजेंद्र मेहता, सतीश वैद्य, स्वप्नील मुथा, सचिन संघवी ,अशोक ओसवाल, प्रबोध शहा, पवन आहुजा, राजेंद्र दोशी ,महावीर मुथा ,साहिल शहा, पारस मेहता ,धीरज किर्वे, सौरभ शहा ,संदीप गलांडे ,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते