बारामतीत पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस केक कापून व दिव्यांग नागरिकांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी मोटरसायकल वाटप करून साजरा
"वर्च्युअल रॅली" या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई येथून स्क्रीन वर करण्यात आले होते.
बारामतीत पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस केक कापून व दिव्यांग नागरिकांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी मोटरसायकल वाटप करून साजरा
“वर्च्युअल रॅली” या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई येथून स्क्रीन वर करण्यात आले होते.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रीय नेते,पद्मविभूषण शरद पवार यांचा ८१वा वाढदिवस विद्या प्रतिष्ठान एमआयडीसी,बारामती येथील गदिमा सभागृहात बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, नगरपालिका गटनेते सचिन सातव,ज्येष्ठ नागरिक अमरसिंह जगताप,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मदन देवकाते,बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक,बारामती पंचायत समिती गटनेते प्रदीप धापटे आदींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. तसेच “वर्च्युअल रॅली” या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई येथून स्क्रीन वर करण्यात आले होते.
यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा अनिता गायकवाड,तालुका युवक अध्यक्ष राहुल वाबळे,शहर युवक अध्यक्ष अमर धुमाळ,तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे,तालुका सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे,विजय खरात बाळासाहेब परकाळे,फिरोज बागवान, बी.आर चौधरी,वैभव बुरुंगले, शिवसेना,काँग्रेसचे पदाधिकारी तसेच सेंट्रल गव्हर्नमेंट ऑलिमकोचे अधिकारी गौरी साळुंखे व त्यांची टीम तसेच तालुका व शहरातील आजी-माजी पदाधिकारी आणि ज्येष्ठ,दिव्यांग नागरिक तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर पद्मविभूषण शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकल्पनेतून व खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रयत्नातून राष्ट्रीय वयोश्री (एडीप) योजनेतून मंजूर झालेल्या बॅटरीवर चालणाऱ्या चोवीस मोटारसायकल चे वाटप बारामती तालुक्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींना वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी,दिव्यांग नागरिक उपस्थित होते.