स्थानिक

बारामतीत पुन्हा हायवाने ज्येष्ठाला चिरडले; नागरीकांमध्ये संतापाचं वातावरण

दोन महिन्यांपूर्वीच एका भीषण अपघातात बाप आणि दोन लेकींचा बळी गेला होता.

बारामतीत पुन्हा हायवाने ज्येष्ठाला चिरडले; नागरीकांमध्ये संतापाचं वातावरण

दोन महिन्यांपूर्वीच एका भीषण अपघातात बाप आणि दोन लेकींचा बळी गेला होता.

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. बारामतीत सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच एका भीषण अपघातात बाप आणि दोन लेकींचा बळी गेला होता.

<span;>शहरातील ढवाण पाटील चौकात सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्धाला डंपरने चिरडले.त्यात मारुती उमाजी पारसे (वय ५५, रा. आनंदनगर, बारामती) या ज्येष्ठाचा जागीच मृत्यू झाला.

<span;>या अपघातानंतर संतप्त बारामतीकरांनी अपघातग्रस्त डंपर तसेच त्या रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका डंपरवर दगडफेक करत मोठा संताप व्यक्त केला. रस्त्यावरच ठिय्या मांडत माणसे मारणारी ही वाहने थांबवणार कधी असा संतप्त सवाल उपस्थित केला.

<span;>दोन महिन्यांपूर्वी बारामती शहरातील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात डंपरखाली आल्याने दोन मुलींसह वडीलांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती. या अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच पुन्हा डंपरने एकाचा जीव घेतल्याने बारामतीकर कमालीचे संतप्त झाले आहेत.

<span;>फलटण रस्त्यावरील ढवाण पाटील चौकात सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता ही घटना घडली. हा डंपर शहरात प्रवेश करत असतानाच त्याने सायकलवरून जात असलेल्या पारसे हे अचानक डंपरच्या खाली चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

<span;>नागरिकांचा संताप आणि तणावपूर्ण वातावरण…!

<span;>या अपघातानंतर परिसरातील नागरिकांचा संताप प्रचंड वाढला. त्यांनी हायवा डंपरवर दगडफेक केली. ढवाण पाटील चौक परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी हायवा डंपर चालकांवर कठोर कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. रस्त्यावरच ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले गेले. पोलिस, आरटीओ प्रशासन अशा वाहनांवर कारवाई का करत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

Back to top button