बारामतीत पोलिसांची दारू अड्ड्यांंवर कारवाई.
बारामती तालुका पोलिसांनी ठीक ठिकाणी गावठी दारू अड्ड्यावर कारवाई केली.
बारामतीत पोलिसांची दारू अड्ड्यांंवर कारवाई.
बारामती तालुका पोलिसांनी ठीक ठिकाणी गावठी दारू अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत १३३ लिटर गावठी व देशी-विदेशी दारूसह दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख ३१ हजार ८१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तालुक्यातील पारवडी, तांदुळवाडी, घाडगेवाडी, झारगडवाडी, माळेगाव, सोनगाव, निरावागज, कटफळ याठिकाणी सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापे टाकून अवैद्य दारू विक्रेत्या अकरा जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शुभम संजय शिंदे,(रा. पारवडी.ता.बारामती), अलका रामचंद्र दुबळे,(रा. तांदुळवाडी.ता.बारामती), गिताबाई अशोक आढागळे,(रा.रा. तांदुळवाडी.ता.बारामती), चेतन बाळू जाधव(रा. माळेगाव.ता.बारामती), विजय जनार्दन पवार,(रा. माळेगाव.बु,ता.बारामती), बाळासाहेब अनिल सावंत((रा. माळेगाव. बु.ता.बारामती), रोहिदास रामचंद्र मदने,( घाडगेवाडी,ता.बारामती), नाना कुंडलिक सोनवणे,( झारगडवाडी,ता.बारामती), आकाश दादासाहेब देवकाते,(रा. निरावागज. ता.बारामती), दिपाली विजय भिसे,( कटफळ. ता. बारामती), वसंत दत्तात्रय गोफणे,( सोनगाव.ता. बारामती) या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.