स्थानिक

फळपिक विमा योजना सन २०२२ मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.

फळपिक विमा योजना सन २०२२ मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.

बारामती वार्तापत्र

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२२ मृग बहाराकरीता राबविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी  सुप्रिया बांदल  यांनी केले आहे.

सदरच्या योजनेचा उद्देश:

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे व नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य बाधीत राखणे.

योजनेचे प्रमुख वैशिष्टे :

१) सदरची योजना अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी आहे. २) कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातीत अधिसुचित पिकांसाठी ऐच्छीक आहे.३) उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. ४) योजनेत नुकसान भरपाई महावेध प्रकल्पांतर्गत महसुल मंडळस्तरावरील स्वंयचलित हवामान केंद्राच्या आकडेवारी नुसार ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे मानवी हस्ताक्षेप राहणार नाही.

एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहार पैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.

एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेवू शकतो. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत देणे आवश्यक आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७/१२, ८(अ) उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्र, बागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबूक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

तालुक्यात पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेंतर्गत डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सिताफळ व द्राक्षे या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.

पिकनिहाय सहभागाची प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता व अतिंम मुदत पुढीलप्रमाणे : – डाळिंब- विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार, विमा हप्ता ६ हजार ५०० व अंतिम मुदत १४ जुलै २०२२. पेरू- विमा संरक्षित रक्कम ६० हजार, विमा हप्ता ३ हजार व अतिंम मुदत १४ जून २०२२. चिकू – विमा संरक्षित रक्कम ६० हजार, विमा हप्ता १३ हजार २०० व अंतिम मुदत ३० जून २०२२. लिंबू- विमा संरक्षित रक्कम ७०हजार, विमा हप्ता ४ हजार ५५० व अंतिम मुदत १४ जून २०२२. सिताफळ- विमा संरक्षित रक्कम ५५ हजार, विमा हप्ता ६ हजार ३२५ व अंतिम मुदत ३१ जुलै २०२२. द्राक्षे-विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार, विमा हप्ता १६ हजार व अंतिम मुदत १४ जून २०२२ आहे.

अधिक माहितीसाठी कृषि खात्याचे तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक बारामती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. विमा कंपनी- अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड, पुणे यांच्याशीही संपर्क साधावा. टोल फ्री क्रमांक – १८००४१९५००४, भ्रमणध्वनी क्र. ८०१०७१२५७५ व pikvima@aicofindia.com या ई-मेलवरही शेतकरी संपर्क करु शकतील.

गर्दी टाळण्यासाठी अंतिम दिनांकाची वाट न पाहता त्यापुर्वी अधिसुचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतक-यांनी फळपिक विमा हप्ता भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहनही तालुका कृषि अधिकारी श्रीमती बांदल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!