बारामतीत ‘फटाका बुलेट’ वर कडक कारवाई
विशेष मोहिमेत 10 अवैध सायलेंसर जप्त; 44 जणांवर विविध गुन्ह्यात कारवाई, दंड ₹1 लाखांपर्यंत

बारामतीत ‘फटाका बुलेट’ वर कडक कारवाई
विशेष मोहिमेत 10 अवैध सायलेंसर जप्त; 44 जणांवर विविध गुन्ह्यात कारवाई, दंड ₹1 लाखांपर्यंत.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात काही दिवसांपासून बुलेट मोटारसायकलींना फटाक्यासारखा मोठा आवाज करणारे अवैध सायलेंसर बसवण्याची प्रवृत्ती वाढली होती. या अतिआवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते. सतत होत असलेल्या त्रासामुळे अनेक नागरिकांनी बारामती वाहतूक शाखेकडे लेखी आणि मौखिक तक्रारी नोंदवल्या होत्या.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत
25 व 26 नोव्हेंबर 2025 रोजी बारामती वाहतूक शाखेकडून शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील विविध भागांत गस्त वाढवून ‘फटाका बुलेट’ चालवणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली.
मोहिमेचा तपशील
अवैध, आवाज वाढवणारे 10 सायलेंसर जप्त
मोटार वाहन कायद्यानुसार 44 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
एकूण ₹1,00,000/- पर्यंत दंड वसूल
सायलेंसर जागेवरच काढून घेऊन वाहतूक शाखेत जप्त
वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शहरात आवाजाचे प्रदूषण वाढू नये आणि नागरिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ही संपूर्ण मोहीम.
पोलिस अधीक्षक संदीप गिल (पुणे ग्रामीण),अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड
यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
अभियानात सहभागी अधिकारी या कारवाईत.
पोलीस निरीक्षक निलेश माने,श्रेणी उपनिरीक्षक सुभाष काळे,पोलिस अंमलदार प्रज्योत चव्हाण, सीमा घुले, रूपाली जमदाडे, माया निगडे, आशा शिरतोडे, सुनीता ढेंबरे, दत्तात्रय भोसले, कुंभार, होळंबे आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरातील शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी नियमांचे पालन करावे आणि अशा अवैध सायलेंसरचा वापर टाळावा.
—





