बारामतीत फेरफार अदालतीचे आयोजन,, शेतकऱ्यांच्या नोंदी होण्यास मार्ग मोकळा, महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी होणार आयोजन
बारामती येथे स्थापन केलेल्या फेरफार कक्षात त्वरीत संपर्क साधावा

बारामतीत फेरफार अदालतीचे आयोजन,, शेतकऱ्यांच्या नोंदी होण्यास मार्ग मोकळा, महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी होणार आयोजन
बारामती येथे स्थापन केलेल्या फेरफार कक्षात त्वरीत संपर्क साधावा
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी प्रत्येक तालुक्यातील मंडल मुख्यालयी फेरफार अदालतीचे आयोजन केले आहे.
तरी बारामती तालुक्यातील ज्या नागरिकांच्या फेरफार नोंदी मुदत संपूनही प्रलंबित आहेत. त्यांनी त्यांच्या मंडल मुख्यालयी संबंधित मंडल अधिकारी यांचे समक्ष फेरफार नोंदी निर्गत करून घ्याव्यात, याकामी काही अडचण आल्यास तहसिल कार्यालय, बारामती येथे नायब तहसिलदार किंवा तहसिलदार यांचेशी संपर्क साधावा.
तसेच ज्या व्यक्तीच्या फेरफार नोंदी मुदत संपूनही प्रलंबित आहेत अशा व्यक्तींनी अनुषंगिक कागदपत्रे घेवून तहसिल कार्यालय, बारामती येथे स्थापन केलेल्या फेरफार कक्षात त्वरीत संपर्क साधावा असे, आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.