बारामतीत बुलेट मोटरसायकलींवरील ‘फटाका सायलेंसर’ विरोधात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
सायलेंसर जप्ती व दंडात्मक कारवाई

बारामतीत बुलेट मोटरसायकलींवरील ‘फटाका सायलेंसर’ विरोधात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
सायलेंसर जप्ती व दंडात्मक कारवाई
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात बुलेट मोटरसायकलला फटाक्यासारखा कर्कश आवाज करणारे सायलेंसर लावून फिरण्याचा त्रास नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून सहन करावा लागत होता. या प्रकाराबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी बारामती वाहतूक शाखेकडे येत होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक शाखेने विशेष कारवाई मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला.
विशेष मोहीम राबवली
दिनांक 06 डिसेंबर 2025 रोजी बारामती वाहतूक शाखेकडून कोर्ट कॉर्नर परिसरात बुलेट मोटरसायकलींवरील विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत फटाका आवाज निर्माण करणाऱ्या सायलेंसरचा विशेष तपास घेण्यात आला.
सायलेंसर जप्ती व दंडात्मक कारवाई
मोहीमेच्या दरम्यान मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली.एकूण 20 फटाका सायलेंसर जप्त करून ते वाहतूक शाखेकडे जमा करण्यात आले.इतर 65 प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.एकूण ₹73,000 इतका दंड आकारण्यात आला.तसेच ड्रंक अँड ड्राइव्ह कलमानुसार १ प्रकरण नोंदवण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली :संदीप गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीणगणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक,सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी
ही कारवाई निलेश माने, पोलीस निरीक्षक,बारामती वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी सुभाष काळे,स्वाती काजळे,सुनीता ढेंबरे, रुपाली जमदाडे,रेश्मा काळे,आकाश कांबळे,अमोल मदने,अजिंक्य कदम,कांबळे,होळंबे,सांगळे,पोंदकुल,बिबे,खोमणे,नवले यांनी केली.
नागरिकांना दिलासा
या कारवाईमुळे शहरातील ध्वनीप्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. पुढील काळातही अशा नियमभंगाविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.






