बारामतीत बेकायदेशीर कामांना पोलिसांचा पाठिंबा? नागरिकांमध्ये वाढता संताप;ठेकेदाराच्या कामामुळे सतत ट्रॅफिक जाम
कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होणार का?

बारामतीत बेकायदेशीर कामांना पोलिसांचा पाठिंबा? नागरिकांमध्ये वाढता संताप;ठेकेदाराच्या कामामुळे सतत ट्रॅफिक जाम
कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होणार का?
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात गेल्या तीन–चार दिवसांपासून सतत ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आहे.शहरात कामे सुरू असताना अनेक कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
बिनपरवानगी रस्ताबंदी, अनधिकृत विद्युत जोडणी?नागरिकांचा आरोप असा की:रस्ते बंद करताना आवश्यक ती परवानगी न घेता अचानक रस्ते बंद करण्यात येत आहेत.काही ठिकाणी वीज कनेक्शन थेट जोडून कामे केली जात असल्याचे दिसून येत आहे.झाडे तोडण्यासारखी कामेही परवानगीशिवाय सुरू असल्याचा दावा नागरिक करतात.
ही सर्व कामे बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत आणि स्टेट हायवेसारख्या महत्त्वाच्या मार्गावर सुरू असून, संबंधित विभागांची परवानगी घेण्यात आली आहे का याबाबत नागरिकांमध्ये शंका आहे.
पोलिसांची भूमिका प्रश्नचिन्हात?
विशेष म्हणजे, या विनापरवानगी कामांदरम्यान काही ठिकाणी पोलिस कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आल्याने अनेक नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
नागरिकांचा सवाल असा की—
“सामान्य नागरिकांनी किरकोळ चूक केली तरी पोलिसांकडून कडक कारवाई होते. पण अशा मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या नियमबाह्य कामांकडे पोलिस दुर्लक्ष करत आहेत का?”यामुळे पोलिस प्रशासन बेकायदेशीर कामांना अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होणार का?
या सर्व घडामोडींमुळे शहरामध्ये रस्ता अडवून सुरू असलेल्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई होणार का, त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार का,तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
नागरिकांच्या मते, या कामांची चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.






