राजकीय

बारामतीत भाजप–राष्ट्रवादी युती नसल्याचे जिल्हाअध्यक्ष यांचे पत्र;तर तुतारी गटाचा एकही उमेदवार नसल्याचे शरद पवार गटाचे तालुकाअध्यक्ष यांचे स्पष्टीकरण

शिर्सुफळ गटामध्ये पंचायत समिती साठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही

बारामतीत भाजप–राष्ट्रवादी युती नसल्याचे जिल्हाअध्यक्ष यांचे पत्र;तर तुतारी गटाचा एकही उमेदवार नसल्याचे शरद पवार गटाचे तालुकाअध्यक्ष यांचे स्पष्टीकरण

शिर्सुफळ गटामध्ये पंचायत समिती साठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही.

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही युती नसल्याचे पत्र सध्या भाजपचे जिल्हा अध्यक्ष यांचे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या पत्रामुळे स्थानिक राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून,विशेषतःशरद पवार गट म्हणजेच ‘तुतारी’ गटाचा एकही उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याची तुतारी गटाचे तालुकाअध्यक्ष एस एन जगताप यांनी फोन माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष एस. एन.बापू जगताप यांनी “आम्हाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सामावून घेतले आहे” अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र प्रत्यक्षात अजित पवार गटाच्या जाहीर उमेदवारी यादीत शरद पवार गटाचा एकही उमेदवार नसल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे शरद पवार गट नेमका कुठे आहे, असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केला जात होता आज तालुकाअध्यक्ष एस एन जगताप यांचे स्पष्टीकरण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दुसरीकडे,ज्या शिर्सुफळ गटामध्ये पंचायत समिती साठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही,त्या ठिकाणी भाजपने थेट किंवा अप्रत्यक्षपणे उमेदवार दिल्याची चर्चा आहे. शिर्सुफळ गटातून राष्ट्रवादीचा उमेदवार नसताना भाजपचा उमेदवार पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात उतरल्याचे बोलले जात आहे. तसेच सुपा गटातही भाजप पुरस्कृत उमेदवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सर्वाधिक चर्चेत असलेल्या निरावागज गटातून भाजपचे नेते अभिजीत देवकाते यांच्या पत्नी यांना ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावर उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या घडामोडींमुळे बारामतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अंतर्गत समन्वय किंवा अप्रत्यक्ष युती असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

मात्र दुसरीकडे भाजप–राष्ट्रवादी युती नसल्याचे जिल्हाअध्यक्ष यांचे पत्र व्हायरल झाल्यामुळे या सर्व चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रत्यक्षात बारामतीतील राजकीय गणित नेमके कसे आहे,हे येत्या काही दिवसांत शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Back to top button