बारामतीत महावीर जयंती उत्साहात साजरी
श्री महावीर भवन येथे विद्याचंद्र मुंबईकर यांच्या वतीने जैन बांधवांसाठी प्रसादभोजनाचे आयोजन केले गेले.
बारामतीत महावीर जयंती उत्साहात साजरी
श्री महावीर भवन येथे विद्याचंद्र मुंबईकर यांच्या वतीने जैन बांधवांसाठी प्रसादभोजनाचे आयोजन केले गेले.
बारामती वार्तापत्र
सकल जैन समाजाच्या वतीने आज बारामतीत श्री महावीर जयंती उत्साहात साजरी केली गेली. सकाळी महावीर पथवरील श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदीरापासून भव्य शोभायात्रेचे आयोजन केले गेले. या मध्ये जैन युवकांच्या ढोल पथकाने पारंपरिक पध्दतीने ढोलवादन केले.
या शोभायात्रेमध्ये दिगंबर, श्र्वेतांबर व स्थानकवासी जैन समुदायाचे बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महावीर पथ, मारवाड पेठ, बुरुडगल्ली मार्गे भिगवण चौक, इंदापूर चौक व गुनवडी चौकातून ही शोभायात्रा गेली.
भिगवण चौकामध्ये उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, योगेश जगताप, प्रशांत नाना सातव, सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर आदींनी स्वागत केले.
दिगंबर जैन समाजाच्या वतीने किशोर शहा (सराफ), जवाहर वाघोलीकर, पदमकुमार मेथा, गौरव कोठडीया, भारत खटावकर, चंद्रवदन मुंबईकर, चकोर वाघोलीकर, संजय संघवी, अजित वडूजकर, श्वेतांबर जैन समाजाच्या वतीने दिलीप दोशी, पी.टी. गांधी, प्रवीण सुंदेचा मुथा, जयेंद्र मोदी, मेहुल दोशी, केवल मोता, जिगर ओसवाल तसेच स्थानकवासी जैन समाजाच्या वतीने दिलीप धोका, ललित टाटीया, किशोर कोठारी, जवाहर कटारिया, पोपटलाल गादिया यांनी स्वागत केले.