शैक्षणिक

बारामतीत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न 

इयत्ता बारावी सन 2001 या वर्षांच्या

  • बारामतीत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न 

इयत्ता बारावी सन 2001 या वर्षांच्या

बारामती वार्तापत्र 

रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी कै. ग. भि. देशपांडे माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात इयत्ता बारावी सन 2001 या वर्षांच्या विद्यार्थ्यांचा तब्बल 24 वर्षांनी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा खूप आनंदात संपन्न झाला.

याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थी सकाळी दहा वाजता शाळेच्या प्रार्थना चौकात उपस्थित राहिले सर्वांनी शाळेने दिलेल्या अल्पोपहाराचा आस्वाद घेतला .त्यानंतर जी वाय जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना ओळीत उभे करून प्रार्थना घेतली व त्यांना वर्गात पाठविले वर्गात गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वपरिचय करून दिला व त्यावेळचे वर्गशिक्षक श्री सूर्यगंध सर यांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली त्यानंतर विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी सभागृहात पाठविण्यात आले यावेळी सभागृहात जाण्यापूर्वी शाळेतील विद्यार्थिनींनी माजी विद्यार्थ्यांना औक्षण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री अजयजी पुरोहित हे आपल्या सुविद्य पत्नी सौ संगीता पुरोहित यांच्यासह उपस्थित होते.

त्याचबरोबर स्थानिक सल्लागार समिती सदस्य माननीय श्री पुरुषोत्तमजी कुलकर्णी हेही यावेळी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री धनंजय मेळकुंदे, पर्यवेक्षक मा.श्री शेखर जाधव मा. श्री नांगरे सर हे या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर सन 2000 2001 साली शिकविणारे प्राध्यापक श्री सूर्यगंध सर, चव्हाण सर, गावडे सर ,जाधव सर, कुलकर्णी सर हेही यावेळी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचा माजी विद्यार्थी श्री सचिन गाडेकर यांनी केले. मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात केली यावेळी प्रशालेच्या संगीत शिक्षिका रसिका सुर्वे यांनी ईशस्तवन व स्वागतगीत गायले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी श्री हिरालाल शिंदे यांनी केले व त्यानंतर मान्यवरांचा परिचय व स्वागत माझी विद्यार्थिनी सारिका गाडेकर हिने केले. सर्व मान्यवरांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व गुलाल पुष्प देऊन केले . शाळेच्या मुख्याध्यापकांनीही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन देऊन सन्मानित केले.

शाळेच्या ऋणातून उतराई म्हणून माजी विद्यार्थ्यांनी एक लाखाचा चेक अध्यक्षांकडे सुपूर्त केला. यानंतर माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले मनोगतातून सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला शिक्षकांनीही आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांसमोर शाळेच्या विकासाचा आराखडा मांडला व विद्यार्थ्यांना शाळेच्या विकासासाठी निधी देण्याचे आवाहन केले.
शाळेची माजी विद्यार्थिनी मयुरा झगडे हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली व त्यानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

Back to top button