शैक्षणिक

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे मंथन प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश.

१४९ विद्यार्थी परीक्षेत सहभागी

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे मंथन प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश.

१४९ विद्यार्थी परीक्षेत सहभागी

बारामती वार्तापत्र 

शै. वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विदयालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये विदयालयातून १४९ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. त्यामधून इ.१ली ते इ.४ थी तील एकूण ७ विद्यार्थ्यांना केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यामध्ये इ.१ली मधून चि. अधिराज हनुमंत बेलदार (केंद्रात तृतीय), इ.२री मधून कु. आराध्य सुनिल होळकर (केंद्रात प्रथम), चि. ध्रुव विवेक जोशी (केंद्रात तृतीय), इ.३री मधून चि. रितेश राहुल वाघमारे (केंद्रात चतुर्थ), इ.४ थी मधून कु. वेदिका गणेश वायाळ (केंद्रात द्वितीय), कु. अन्वी अजित पवार (केंद्रात तृतीय), कु. शिवानी संदिप गुट्टे (केंद्रात चतुर्थ) यांचा समावेश होतो.

या सर्व गुणवंत व स्पर्धा परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ विद्यालयात शुक्रवार दि.२५/०७/२०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन प्रमुख पाहुणे व संस्थेच्या मान्यवर संचालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे यांनी या स्पर्धेविषयी माहिती सांगून स्पर्धात्मक युगाविषयी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाची स्नातक विद्यार्थिनी कु. प्रेरणा बसवराज जलकोटे (CSIR NET EXAM – All India Rank 76) या उपस्थित होत्या त्यांनी आपल्या शाळेतील आठवणी यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या तसेच विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आणि मेहनतीने यश संपादन करता येते असा यशाचा मार्ग सांगितला तसेच प्रमुख अतिथी म्हणून बारामती तालुका मंथन प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा समन्वयक मा. सौ. वैशाली धापटे या उपस्थित होत्या त्यांनी सर्व बक्षीसपात्र विदयार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर) हे उपस्थित होते त्यांनी त्यांच्या मनोगतात सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढे स्पर्धा परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे शिक्षक आयर्नमॅन श्री. अजिंक्य साळी तर आभार शिक्षिका कु. श्रद्धा कडाळे  यांनी मानले.

Related Articles

Back to top button