स्थानिक

बारामतीत मोफत बाल हृदयरोग निवारण शिबिर;१५० हून अधिक बालरुग्णांचा सहभाग

१५० हून अधिक बालरुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला.

बारामतीत मोफत बाल हृदयरोग निवारण शिबिर;१५० हून अधिक बालरुग्णांचा सहभाग

१५० हून अधिक बालरुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला.

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील नामांकित डॉक्टर समकित मुथा,डॉक्टर संतोष जोशी आणि डॉक्टर सौरभ मुथा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बाल हृदयरोग निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये लहान मुलांच्या हृदयाची अत्याधुनिक टुडी ,इको तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली.तपासणीदरम्यान हृदयरोगाचे निदान झालेल्या बालरुग्णांना पुढील उपचारही मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक डॉक्टरांनी दिली. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या शिबिराला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १५० हून अधिक बालरुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला. समाजातील गोरगरीब लहान मुलांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सुरू ठेवणार असल्याचे डॉक्टर राजेंद्र मुथा आणी डाॅ सौरभ मुथा यांनी सांगितले.

Back to top button