इंदापूर

कदम विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन.

कदम विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन.

साध्या पद्धतीने जयंती साजरी.

इंदापूर:-प्रतिनिधी
आज रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133 वी जयंती. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी होत असते. कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढून, घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला जातो. परंतु यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत व शाळा बंद असल्याने पहिल्यांदाच सर्वत्र अतिशय साध्या पद्धतीने जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.

रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये अण्णांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कर्मवीर अण्णांनी खेडोपाडी जाऊन तळागळातील अशिक्षित मुलांना शिकवले. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रगती झाली.आजही समाजात अनेक शिक्षणापासून वंचित मुले आहेत किंवा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही त्यांचे शिक्षण थांबले जाते अशा विद्यार्थ्यांना मदत करून आपण महापुरुषांच्या कार्याला कृतीतून अभिवादन केले पाहिजे असे मत इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांनी व्यक्त केले.तर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शाळा व समाज यांच्या माध्यमातून विविध महापुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित छोटी छोटी पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिली पाहिजेत.जेणेकरून त्यांचे कार्य व विचार विद्यार्थ्यांना समजतील व ते आचरणात येतील असे मत विद्यालयाचे माजी विद्यार्थी इंदापूर नगरपालिकेचे गटनेते कैलास कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, विद्यालयाचे माजी विद्यार्थी व गटनेते कैलास कदम, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील,जेष्ठ नागरिक व्यवहारे व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन सुनिल मोहिते यांनी केले.

Related Articles

Back to top button