बारामतीत रंगली या बॅनरची जोरदार चर्चा,”मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यानं…”, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरून अजितदादांना टोला
बॅनर सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला
बारामतीत रंगली या बॅनरची जोरदार चर्चा,”मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यानं…”, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरून अजितदादांना टोला
बॅनर सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळावर सस्पेन्स असताना उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत आहेत. अजित पवार यांनी गुरुवारी त्यांचे काका आणि राष्ट्रवादी-शरद गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
यावेळी अजित यांनी त्यांचे काका शरद पवार यांचेही आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळही उपस्थित होते. महाराष्ट्रात नव्या सरकारला शपथ घेऊन आठवडा उलटला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने बारामतीमध्ये शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव करणारे बॅनर्स लागलेले आहेत.
परंतु अनेक बॅनरचे अजित पवारांना खोचक टोला लगावणारे आहेत. बारामतीतील पंचायत समिती चौकात ‘मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही’ अशा आशयाचा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तर नगर परिषदेत समोर देखील अजित पवारांना टोला लगावणारा बॅनर लावला आहे.
शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना सर्व प्रकारे शुभेच्छा दिल्या जात आहेत. बारामती शहरात सर्वत्र शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. अनेक बॅनर वरती अजित पवारांना टोलाही लागवण्यात आले आहेत. बारामती पंचायत समिती परिसरामध्ये ‘मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या एका बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, त्याच्यावरती असलेला मजकूर सर्वात ज्या चर्चेचा विषय ठरत आहे.
बारामतीत मात्र एका बॅनरद्वारे अजित पवार यांना चिमटा काढण्यात आला. या बॅनरची जोरदार चर्चा बारामतीत रंगली. ‘मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्या, म्हणून विठ्ठलाचे महत्व कमी होत नाही’ अशा आशयाचा हा फलक बारामतीत मुख्य ठिकाणीच लावण्यात आला आहे.
‘मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्याने विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही’, हा बॅनर सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा बॅनर जरी शरद पवारांना शुभेच्छा देणार असला तरी यातून अजित पवारांना टोला लगावण्यात आला आहे.
खा. शरद पवार यांच्या वाढदिनी उपमुख्यमंत्री पवार, खा. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार आदींनी दिल्लीत त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु या भेटीपेक्षा बारामतीत पंचायत समितीसमोर साहेबप्रेमी बारामतीकराने लावलेल्या बॅनरचीच अधिक चर्चा झाली.
खा. शरद पवार यांचा वाढदिवस म्हणजे बारामतीत भरगच्च कार्यक्रम अशी स्थिती यापूर्वी होती. सांस्कृतिक, मनोरंजन, नाट्य, क्रीडा, कला, सहकार आदी सर्व क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते.
बदललेल्या राजकीय स्थितीत लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना यश आले. परंतु विधानसभेला अजित पवार यांनी त्याची परतफेड केली. त्यामुळे यंदा वाढदिवस कार्यक्रमावर मर्यादा आल्या.
पक्ष व कुटुंबातील फूटीनंतर पवार कुटुंबियांनी गुरुवारी दिल्लीत शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या असल्या तरी बारामतीत मात्र वाढदिनी शांतताच होती.
ज्या सहकारी संस्थांच्या उभारणीत शरद पवार यांनी मोलाचे योगदान दिले, त्यांनीही बदलत्या राजकीय स्थितीत वाढदिनी कार्यक्रम घेतले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून काही समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले.
बोटावर मोजता येतील इतकेच फ्लेक्स
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर बारामती शहर व तालुका फ्लेक्समय झाला आहे. गेली ५० वर्षाहून अधिक काळ बारामतीसाठी योगदान देणाऱ्या शरद पवार यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लागल्याचे दिसून आले.