शैक्षणिकस्थानिक

बारामतीत रयत बँकेतर्फे गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न

अध्यक्षीय भाषणात श्री अविनाश देवकाते यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत बँकेच्या कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या

बारामतीत रयत बँकेतर्फे गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न

अध्यक्षीय भाषणात श्री अविनाश देवकाते यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत बँकेच्या कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या

बारामती वार्तापत्र

दि रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक ली सातारा या बँकेच्या बारामती शाखेच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती शाखा कार्यक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत श्री राजेंद्र शिर्के यांनी रयत बँकेची चालू असलेली कामगिरी सांगत सभासदांसाठी बँकेतर्फे राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अविनाश देवकाते होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जनरल बॉडी सदस्य श्री लालासाहेब नलवडे,श्री नामदेव शितोळे,श्री अमोल पाटील,मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री सुभाष लकडे,योगेश देवकाते,श्री नितीन शेंडे,टेक्निकल विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवान भिसे, उपस्थित होते.

यावेळी इ 5 वी ,8 वी शिष्यवृत्ती परीक्षा,रयत प्रज्ञा शोध परीक्षा,NMMS परीक्षा,10 वी,12 वी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थांचा प्रमाणपत्र,ट्रॉफी,व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.तसेच नेट परीक्षा प्राप्त श्री विकास जाधव यांचाही सन्मान करण्यात आला.पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री विश्वास देवकाते यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या कामाचे कौतुक करत गुणवंत विद्यार्थांचे अभिनंदन केले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री अविनाश देवकाते यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत बँकेच्या कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे आयोजन शाखा समितीचे चेअरमन श्री राजेंद्र शिर्के,सभासद प्रतिनिधी श्री निलेश गायकवाड,श्री सुनील म्हस्के,,शाखाधिकारी श्री गजानन बडवे यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.किशोरी सातव यांनी केले. प्रास्ताविक श्री राजेंद्र शिर्के यांनी केले तर निलेश गायकवाड यांनी आभार मांडले.

Back to top button