राजकीय

बारामतीत राजकारण तापले आताच झालेल्या निवडीवरून चर्चांना उधाण

मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

बारामतीत राजकारण तापले आताच झालेल्या निवडीवरून चर्चांना उधाण

मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

बारामती वार्तापत्र

बारामतीत काल झालेल्या एका महत्त्वाच्या निवडीमुळे स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, येणाऱ्या पाच वर्षांच्या राजकीय समीकरणांवर याचा खोल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली असून, त्यामुळे बारामतीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीत एस. एस. गट आणि के. जी. गट हे दोन स्वतंत्र गट नव्याने सक्रिय झाल्याची चर्चा आहे. या दोन्ही गटांमधील संघर्षामुळे पक्षांतर्गत राजकारण अधिकच तीव्र झाले असून, याच गटबाजीचा परिणाम म्हणून आता झालेल्या निवडणुकीत तब्बल सहा अपक्ष नगरसेवक निवडून आले.

दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या नेतेपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर नावांची चर्चा झाली होती त्यावेळी दोन नाव देण्यात आली होती त्यातील एकाला पसंती मिळणार होती! असे समजले होते मात्र अचानक दुसरे नाव आल्याने दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला.मात्र,काल झालेल्या निवडीत घडलेल्या घडामोडींनी सर्वांनाच आश्चर्याचा नवीनच नावाची निवड झाल्याने सर्वांना धक्का दिला आहे  त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शाब्दिक चकमक झाल्याचे समजते.सूत्रांच्या माहितीनुसार,ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत मुख्यमंत्री बदलले जातात, त्याच धर्तीवर या निवडीतही प्रमुख दावेदार अचानक बदलण्यात आला. त्यामुळे आधी ठरलेली नावे बाजूला पडली आणि नव्या नावाला संधी मिळाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

या घडामोडीमुळे येणाऱ्या पंचवार्षिक काळात के. जी. गट आणि एस. एस. गट यांच्यात पुन्हा एकदा तीव्र संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, मिळालेल्या माहितीनुसार काही ज्येष्ठांनी स्वीकृत पद घेण्यास नकार दिला असून?,बारामती नगर परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचेही समजते.हा निर्णय पक्षासाठी आणि स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.एकूणच,बारामतीतील या राजकीय घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, पुढील काळात बारामतीचे राजकारण अधिकच रंगतदार आणि संघर्षपूर्ण होणार असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

Back to top button