राजकीय

बारामतीत राजकीय घडामोडी वेगात; लक्ष्मण हाके निवडणूक रेसमधून बाहेर

बंद दाराआड त्यांची काही वेळ चर्चा झाली

बारामतीत राजकीय घडामोडी वेगात; लक्ष्मण हाके निवडणूक रेसमधून बाहेर

बंद दाराआड त्यांची काही वेळ चर्चा झाली

बारामती वार्तापत्र 

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही, अशी गर्जना करणारे ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी अखेर आपली तलवार म्यान केली.

सोमवारी (दि. ६) सकाळी बारामतीत वेगवान घडामोडी घडल्या. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हाके यांच्याशी चर्चा केली. त्यांची ही शिष्टाई फळाला आल्याचे स्पष्ट झाले.

बारामतीत संपतराव टाकले यांच्या निवासस्थानी नामदार भरणे व हाके यांच्या चर्चा झाली. यावेळी पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर हे देखील बैठकीला उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा केलेला सर्वांगीण विकास, राज्याच्या विकासात त्यांचे असणारे योगदान लक्षात घेऊन हाके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती भरणे यांनी केली.

बंद दाराआड त्यांची काही वेळ चर्चा झाली. हाके यांनी ती मान्य करत संयुक्त पत्रकार परिषद घेत पवार यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. दरम्यान गेल्या महिनाभरापासून हाके यांनी बारामतीची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार असे सांगत रान उठवले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे जवळपास निश्चित झाले होते. परंतु सोमवारी सकाळी घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर हाके यांनी माघार घेतली. हाके यांनी केलेल्या सहकार्याबद्दल भरणे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Back to top button