बारामतीत राजकीय वातावरण तापलं; फलकातून तटकरे पटेल यांना समर्थकांचा इशारा
प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेतात

बारामतीत राजकीय वातावरण तापलं; फलकातून तटकरे पटेल यांना समर्थकांचा इशारा
प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेतात
बारामती वार्तापत्र
बारामतीत राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र दिसत आहे. बारामती प्रशासकीय भवन परिसरात लावण्यात आलेल्या फलकांमुळे नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहे.
विशेष म्हणजे, “दादा” समर्थकांकडून हे फलक लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या माध्यमातून त्यांनी काही विशिष्ट नेत्यांविरोधात आपला निषेध व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
“फक्त अजितदादांचे नावच पुरेसे आहे, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही समस्त दादा प्रेमी,” असा स्पष्ट संदेश या फलकांतून दिला जात असल्याचे दिसून येते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच असे फलक झळकल्याने बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे. या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे समर्थकांचा उत्साह दिसत असताना, दुसरीकडे अशा प्रकारचे फलक लागल्याने वातावरण तापण्याचे शक्यता आहे.येत्या काळात या प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






