बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या पतीने वर्दीवर टाकला हात..
या प्रकरणा नंतर पोलिसांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.
बारामतीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या पतीने वर्दीवर टाकला हात..
या प्रकरणा नंतर पोलिसांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीत वाहनतपासणी दरम्यान भर रस्त्यावर राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीकडून बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्याची कॉलर धरून कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडून आला आहे.
यामुळे समाजात आता तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटु लागल्या असून, या घटनेचा नागरिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी रस्त्यावर चाललेला भयानक गोंधळ नागरिकांना पाहायला मिळाला. राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवार यांच्या बारामतीत कायद्याचे रक्षण करणाऱ्यावर असे हात उचलण्या पर्यंत मजल गेल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे बारामतीत चर्चेला उधाण आले आहे. हि बाब समजताच या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणा नंतर पोलिसांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.
घडलेला प्रकार असा की बारामती येथील पेन्सिल चौकात पोलीस अधिकारी, महिला कर्मचारी, होमगार्ड बेशिस्त वाहनांवर कारवाई करत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेविका पतीसह चार चाकी वाहनातून येत असताना चार चाकी वाहन होमगार्डच्या पायावरुन गेले. यावेळी पोलिसांनी त्या पदाधिकाऱ्याला गाडी थांबविण्यासाठी विनंती केली. मात्र, तरी देखील गाडी थांबवून बाजूला घेतली गेली नाही. यावेळी पोलिसांनी पळत जाऊन गाडी रोखली व पदाधिकाऱ्याला गाडेच्या बाहेर उतरण्यास सांगितले मात्र, तो गाडीच्या बाहेर उतरायला तयार नव्हता, यावेळी पोलीस अधिकारी तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीची चावी काढून घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने मनात राग धरत पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ केली. यावेळी पदाधिकाऱ्याच्या पत्नीने देखील यावेळी पोलिसांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान संतप्त झालेल्या महिला पोलिसांसह पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवत पदाधिकाऱ्याला देखील चांगलाच चोप दिला. यावेळी हा सर्व प्रकार नागरिकांनी पाहिला. यामुळे समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली आहे. यामुळे हि बाब खेदाची आहे. यावेळी ही घटना समाजातच क्षणी प्रतिष्ठा जपण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचे समजते. तर अध्याप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते. यामुळे सामान्य जनते प्रमाणे पोलीसांना शिवीगाळ करत हात उचलनाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार व वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाईसाठी काय भूमिका घेणार याकडे लक्ष वेधून आहे.