स्थानिक

बारामतीत रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी

रुग्ण दगावल्या नंतर तीन दिवसांनी घडला प्रकार

बारामतीत रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी

रुग्ण दगावल्या नंतर तीन दिवसांनी घडला प्रकार

बारामती वार्तापत्र

बारामतीमधील चैतन्य हॉस्पिटल येथे स्वादुपिंडाच्या विकारावर उपचार घेण्यासाठी लासुर्णे ता. इंदापुर येथील रुग्ण दाखल झाला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्या नंतर तीन दिवसानंतर हा प्रकार घडला
याबाबतची माहिती अशी की शहरातील शशांक जळक यांच्या दवाखान्यात एक ज्येष्ठ रुग्ण स्वादुपिंडाच्या उपचारासाठी आला होता उपचारादरम्यान ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला त्यानंतर नातेवाईकांची कोणतीही तक्रार नव्हती परंतु मृत्यूच्या तीन दिवसानंतर संबंधित रुग्णाच्या नात्यातील एक व्यक्ती येऊन डॉक्टरांना मृत्यूप्रकरणी जाब विचारत त्याचबरोबर शिवीगाळ करून दवाखाना जाळून टाकेल व डॉक्टरांनाही जिवे मारून टाकण्याची धमकी देऊन दवाखान्यातील इतर कर्मचाऱ्यांनाही संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केलि यासंदर्भात डॉक्टरांनी बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून यावेळी डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते
मागील महिन्यात बारामतीतील एका डॉक्टरांना अशाच प्रकारे शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार घडला होता ते प्रकरण ताजे असतानाच हा दुसरा प्रकार घडल्याने शहरांमध्ये डॉक्टर असुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली उच्च न्यायालयानेही अशा प्रकारांवर लक्ष ठेवले असून रुग्णाच्या नातेवाईकास एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता परंतु समाजातील काही विकृत गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे समाजातील सर्वच डॉक्टरांसह नागरिकांना याचा त्रास होत आहे यामुळे संबंधितावर पोलिसांनी कठोर कारवाई करून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी

Related Articles

Back to top button