बारामतीत रेशनिंगच्या धान्याची काळाबाजारी करणारा टेम्पो पकडला ; दोन आरोपींना अटक
25 पिशव्या तांदूळ आढळून आला.

बारामतीत रेशनिंगच्या धान्याची काळाबाजारी करणारा टेम्पो पकडला ; दोन आरोपींना अटक
25 पिशव्या तांदूळ आढळून आला.
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामतीत सद्या रेशनिंगचा काळाबाजार चालू असल्याचे होत असलेल्या दाखल गुन्हा वरून दिसुन येत आहे, वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नव्हती तहसील कार्यालय याकडे कानाडोळा करीत आहे की काय अशीच सद्या चर्चा चालू असून प्रत्यक्ष पोलिसांनाच कारवाई करण्याची वेळ येत आहे आणि त्यांनी देखील अश्या अनेक कारवाई केली असून येथून पुढे देखील करतीलच
पण तहसील कार्यालय यासाठी काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
अशी पुन्हा एकदा बारामतीतील नीरा बारामती रस्त्यावरील नंदन पेट्रोल पंपासमोरील बारामती येथील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ घेऊन तो खुल्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला टेम्पो बारामती पोलिसांनी श्रीराम नगर भिगवण रोड येथे पकडला. यामध्ये 25 तांदळाची पोती पोलिसांनी पकडली.
ही घटना 10 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील श्रीराम नगर येथे घडली यामध्ये बारामती पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, पिकअप (क्र. MH 42 AQ 3603) मध्ये मोहन शंकर रणदिवे यांच्या निरा बारामती रस्त्यावरील नंदन पेट्रोलपंपासमोर सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून खाजगी पिशव्यांमध्ये रेशनिंगचा माल भरून तो खुल्या बाजारात विक्रीसाठी निघाला आहे.
ही माहीती मिळताच पोलिस पथक श्रीरामनगर भिगवण रोड येथे पोहोचले. या वाहनाची तपासणी केली असता, त्याच्या हौदामध्ये एकूण 25 पिशव्या तांदूळ आढळून आला. या वाहनाचा चालक सोमनाथ रामचंद्र भापकर (रा. सटवाजीनगर बारामती) याच्याकडे विचारणा केली तेव्हा या पिशव्यांमध्ये तांदुळ असून तो मोहन शंकर रणदिवे यांच्या दुकानातील असून तो मार्केट यार्ड बारामती येथे विक्रीकरीता घेवून जाण्यासाठी मोहन रणदिवे यांनी सांगितल्याचे चालकाने सांगितले.
यावरून हा तांदूळ बेकायदेशीरपणे विनापरवाना खुल्या बाजारात विक्रीकरीता घेवून जात असल्याची खात्री झाल्याने तसेच त्या बाबत काहीएक पुरावे देऊ न शकल्याने एकूण १ लाख ७८ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी स्वस्त धान्याबाबत असलेल्या शासनाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. दोन्ही आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमख यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस
अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस नाईक खांडेकर पोलीस नाईक तुषार चव्हाण व पवार यांनी केलेली आहे.