स्थानिक

बारामतीत लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एकावर गुन्हा दाखल

बारामतीत लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एकावर गुन्हा दाखल

बारामती वार्तापत्र
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बारामती येथील प्रतीक रासकर याच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयीची हकीकत अशी की पुणे येथील शास्त्रीनगर, येरवडा येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून बारामती परिसरातील लॉजवर मे 2020 पासून ते 10 नोव्हेंबर दरम्यान वेगवेगळ्या लॉजवर बलात्कार केल्याची घटना नोंद झाली आहे. याविषयी पीडित मुलीने येरवडा येथे पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती ती तक्रार बारामती शहर पोलीस स्टेशनला वर्ग झाल्यानंतर सदरच्या व्यक्ती विरोधात अपहरण, बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची मुलगी अल्पवयीन असून ती मुलगी गरोदर राहिल्याने सदरचा प्रकार समोर आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button