बारामतीत वकील संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
51 बॅग रक्तसंकलन
बारामती वार्तापत्र
वकिलीचा व्यवसाय करत असतानाही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कोरोना काळात रक्तचा तुटवडा भासत असल्यामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त बारामतीत वकील संघटना व इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित मानिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. चंद्रकांत सोकटे, अँड.एस एन बापू जगताप, अँड. ए व्ही प्रभुणे, अँड.भगवानराव खारतोडे , अँड. नीलिमाताई गुजर, वकील संघटनेच्या उपाध्यक्ष बापूराव शिंगाडे, अँड. स्नेहा भापकर यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करत रक्तदान शिबिर पार पडले. या आयोजित शिबीरामध्ये ५१ वकिलांनी रक्तदान केले. या प्रसंगी अध्यक्ष चंद्रकांत सोकटे यानी मनोगत व्यक्त केले.अँड. राजेन्द्र काळे , अँड. विजय तावरे ,अँड. रासकर, सरकारी वकील बालासाहेब शिंगाडे , अँड. विजयसिंह मोरे , अँड. वसंतराव गावड़े , अँड सचिन वाघ , अँड. धीरज लालबीगे या सह वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
हा कार्यकम यशस्वी पार पाडण्यासाठी वकील संघटनेचे सचिव अँड. अजित बनसोडे सहसचिव गणेश शेलार, ग्रंथपाल स्वरूप सोनवणे, महिला प्रतिनिधि अँड. प्रणीता जावळे यानी परिश्रम घेतले.