बारामतीत ‘ वसुंधरे ‘ साठी हरित शपथेचे आयोजन
ऑनलाइन हरित शपथेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद
बारामती वार्तापत्र
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षण 2019 कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभियान 2 ऑक्टोबर पासून सुरू झाले आहे. या अभियानात बारामती नगर परिषदेने ही भाग घेतला आहे.
पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या पंचतत्त्व वर आधारित शहराचे मूल्यांकन होणार आहे. शहरातील नागरिकांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी आणि वसुंधरा जपावी व शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवणेचे आवाहन नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ पौणीमा ताई तावरे यांनी केले होते त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद देत शुक्रवारी दिनांक 1 जानेवारी रोजी शहरात विविध ठिकाणी हरित शपथे चे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेतहि नगराध्यक्षा यांचे उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना हरित शपथ देण्यात आली व नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले
या कार्यक्रमासाठी हनुमंत पाटील सचिन सातव बाळासाहेब जाधव दीपक मलगुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे विविध बँका चे अधिकारी उपस्थित होते यावेळी नगरपालिकेच्या सर्व शाळातून व शहरात असणाऱ्या सर्व बँका कंपन्या येथील सुमारे 800 नागरिकांनी हरीत शपथ घेतली. विजय शितोळे अक्षय नाईक सुभाष नारखेडे विजय सूर्यवंशी स्नेहल घाडगे प्राजक्ता शिंगाडे हे अधिकारी उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण एन एक्स टी 331 चॅनलवर करण्यात आले होते. त्यालाही नागरिकांनी प्रतिसाद दिला .यावेळी शहरातील सर्व शाळा कॉलेज मध्ये हा उपक्रम राबविण्यात आला .
नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपली बांधिलकी म्हणून कटिबद्ध राहावे व इथून पुढील काळात शहराला स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी सहकार्य द्यावे असे आवाहन नगराध्यक्ष सौ पौर्णिमा ताई तावरे यांनी केले.