स्थानिक

बारामतीत वाढत्या गॅस दर वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला आघाडीने केले आंदोलन

उपस्थित महिलांनी देखील केंद्रसरकार विरोधी घोषणा दिल्या.

बारामतीत वाढत्या गॅस दर वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला आघाडीने केले आंदोलन

उपस्थित महिलांनी देखील केंद्रसरकार विरोधी घोषणा दिल्या.

बारामती वार्तापत्र

राज्यात ठिकठिकाणी केलेल्या आंदोलना दरम्यान बारामती मध्येही तालुका व शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी व बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. निषेध आंदोलन बारामती येथील पोस्ट ऑफिस कार्यालयापुढे करण्यात आले.
आंदोलन प्रसंगी निषेध फलक हातामध्ये घेउन केंद्र सरकारचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला.

गॅस,पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून कोरोना परिस्थितीमुळे अनेक कुटुंब उद्वस्थ झाले आहेत.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत व छोटी-मोठे व्यवसाय मोडकळीस आल्याने सामान्य जनतेवर उपासमारीचे दिवस आलेले असताना देखील निष्क्रिय केंद्र सरकार सतत गॅस,पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढ करत असल्याचे सांगत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा वनिता बनकर यांनी केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला.

उपस्थित महिलांनी देखील केंद्रसरकार विरोधी घोषणा दिल्या.
गॅस व इंधन दरवाढ कमी करण्यासंदर्भातील निवेदन व शेणाच्या गौऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने पाठवण्यात आल्या.
याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा वनिता बनकर, बारामती शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा आरती शेंडगे,बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्षा संगिता पाटोळे मनीषा रासकर,दिपाली पवार आदींसह तालुका व शहरातील युवती व महिला आदींनी उपस्थित राहून निषेध आंदोलन केले.

Related Articles

Back to top button