राजकीय

बारामतीत विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात;युगेंद्र पवारांचा अजितदादांवर पहिल्यांदाच थेट हल्ला, म्हणाले…

9 कोटी खर्च केले मग विकास कुठे आहे?

बारामतीत विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात;युगेंद्र पवारांचा अजितदादांवर पहिल्यांदाच थेट हल्ला, म्हणाले…

9 कोटी खर्च केले मग विकास कुठे आहे?

बारामती वार्तापत्र

विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आता मैदानात उतरले आहे. महाराष्ट्रातील हायहोल्टेज लढत म्हणून बारामतीकडे पाहिलं जात आहे.

शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी पहिल्यांदाच थेट अजित पवारांवर हल्ला केला. बारामतीच्या विकासासाठी 9 कोटी खर्च केले मग विकास कुठे आहे? असा थेट सवालच युगेंद्र पवार यांनी अजितदादांना विचारला आहे.

बारामती मतदारसंघातील शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत युगेंद्र पवार यांनी अजित पवारांची थेट टीका केली.

‘दादा म्हणतात बारामती विकासाला 9 कोटी खर्च केलेत. मग विकास कुठंय? फक्त ठेकेदारांचे खिसे भरले म्हणजे विकास होत नाही. बारामतीला अजित दादांनी हायफाय बसस्टँड बांधलं पण एसटी बसेसचं काय? ग्रामीण भागात लोकांना एसटी मिळत नाहीत, असं म्हणत युगेंद्र पवार यांनी अजितदादांवर पहिल्यांदाच शाब्दिक हल्ला चढवला.

‘पवार फॅमिली स्पीट झाली हे दुर्दैवी आहे. अजितदादा आज गोविंदबागेत भाऊबिजेला आले नसले तरी मी आलोय ना आमचा सगळा परिवार होता. फक्त साहेब आणि दादा नव्हते, असंही ते म्हणाले.

‘बारामतीत भाजपचे जेवढे जास्त नेते माझ्या विरोधात उतरतील तेवढाच माझा विजय पक्का होत जाईल. अजितदादा बारामतीच्या विकासाबाबत कितीही बोलत असले तरी बारामती अजूनही समतोल विकास झालेला नाही आणि तोच समतोल विकास करण्यासाठी मी शरद पवारांचा उमेदवार म्हणून मैदानात उभा आहे, असंही युगेंद्र पवारांनी म्हटलंय.

Related Articles

Back to top button