ब्रेकिंग न्युज; बारामतीत उपचारासाठी दाखल करून घेण्याकरता रुग्णांकडून पैसे मागणाऱ्या डॉक्टरची वरिष्ठ स्तरावरून झालेल्या चौकशीनंतर संबंधित सेंटर वरून हाकालपट्टी; नातेवाईकांनी पुरावे दिल्याची चर्चा
यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी काही पुरावे देखील वरिष्ठ स्तरावर दिले.

बारामतीत उपचारासाठी दाखल करून घेण्याकरता रुग्णांकडून पैसे मागणाऱ्या डॉक्टरची वरिष्ठ स्तरावरून झालेल्या चौकशीनंतर संबंधित सेंटर वरून हाकालपट्टी; नातेवाईकांनी पुरावे दिल्याची चर्चा
यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी काही पुरावे देखील वरिष्ठ स्तरावर दिले.
बारामती वार्तापत्र
बारामतीत एकीकडे सिल्वर जुबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कमी डॉक्टरांच्या संख्येत देखील रूग्णांवर जिवापाड उपचार सुरू असताना व रुग्णांच्या बाबतीत काहीही कमतरता पडू देत नसताना दुसरीकडे शासकीय महिला रुग्णालयात शेजारील सेंटर मधील एका डॉक्टरने मात्र रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याकरता पैसे मागितले. याची गंभीर दखल वरिष्ठ स्तरावर घेतली गेल्याने या डॉक्टरची चौकशी करण्यात आली असून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशानंतर या डॉक्टरची तिथून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बारामतीतील शासकीय महिला रुग्णालय शेजारील या ऑक्सिजन उपचार दवाखान्यात संबंधित डॉक्टर हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्याकरता रुग्णांच्या नातेवाइकांकडून रक्कम घेत होता अशी तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांकडे केली. तसेच रिमिडेसीवीर इंजेक्शन देखील आपण मिळून घेतो, त्याकरता हा डॉक्टर मोठी रक्कम मागत होता अशीही रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार होती.
यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी काही पुरावे देखील वरिष्ठ स्तरावर दिले. त्यावरून वरिष्ठ स्तरावर याची गंभीर दखल घेण्यात आली आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे याची विचारणा करण्यात आली. त्यावरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर काल बारामती येथे आले होते. त्यांनी या संदर्भात प्रारंभीची चौकशी करून अहवाल देण्याची व कारवाई करण्याचे आदेश शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांना दिले होते.
त्यानंतर ही कारवाई करण्यात आली यासंदर्भात डॉक्टर सदानंद काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या डॉक्टर संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या या तक्रारी गंभीर असल्याने त्यांची तातडीने तेथून बदली करण्यात आली खरे तर या कोरुना च्या काळामध्ये रुग्णावर व्यवस्थित उपचार करून सेवा करण्याची संधी अधिक होती काहीजण चुकीचे काम करत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही असे काळे यांनी सांगितले.
दरम्यान या डॉक्टरची फक्त बदली करून चालणार नाही तर त्याला निलंबित करायला हवे अशी मागणी आता होऊ लागली असून याची देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या डॉक्टर संदर्भात मागील महिन्याभरातच खूप तक्रारी लोकांनी केलेल्या आहेत असे समजते.