स्थानिक

बारामतीत वीर सावरकर स्विमर्स क्लबतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी क्लबच्या स्टाफचे मोलाचे सहकार्य

बारामतीत वीर सावरकर स्विमर्स क्लबतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी क्लबच्या स्टाफचे मोलाचे सहकार्य

बारामती वार्तापत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याच परंपरेत यंदा बारामतीतील नामांकित वीर सावरकर स्विमर्स क्लबतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन क्लबचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी क्लबचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर, डॉ. एम. आर. दोशी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

वीर सावरकर स्विमर्स क्लब हे बारामतीतील एक प्रतिष्ठित व लोकप्रिय संस्थान असून येथे वार्षिक सभासदत्व घेणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. शहरातील तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना या क्लबच्या विविध उपक्रमांची आवड आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आपल्या भाषणातून या क्लबच्या कार्याचा अनेकदा उल्लेख करतात. क्लबमधील प्रशिक्षित स्टाफ व प्रशिक्षकांच्या सहकार्यामुळे येथे सातत्याने सामाजिक आणि क्रीडा उपक्रम राबवले जातात.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी क्लबच्या स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले. गणेश सातव, सुनील खाडे, जितेंद्र कांबळे आदी कार्यकर्त्यांनी शिबिराच्या आयोजनात विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमाला यश मिळवून दिले.

Back to top button