इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटलांची उजनी जलाशय परिसरात आपत्ती कार्यशाळा
पुणे येथील ज्ञानदा फाउंडेशन चा पुढाकार

इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटलांची उजनी जलाशय परिसरात आपत्ती कार्यशाळा
पुणे येथील ज्ञानदा फाउंडेशन चा पुढाकार
इंदापूर : प्रतिनिधी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांच्या वतिने तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच “ज्ञानदा फाउंडेशन” पुणे यांच्यामार्फत कालठण नं. २ येथील उजनी जलाशय परिसरामध्ये इंदापूर तालुक्यातील पोलिस पाटलांची आपत्ती निवारण (बोट रेस्क्यू) कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये स्पीड बोट जोडणी व वापर, पाण्यामध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. ज्ञानदा फाउंडेशन पुणे यांचे तज्ञ प्रशिक्षक श्री.बालवडकर यांनी सदरच्या कार्यशाळेस मार्गदर्शन केले व पोलिस पाटलांकडून प्रात्यक्षिक करून घेतली.प्रसंगी बोलताना त्यांनी आपत्ती निवारणाबाबत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस पाटील कार्यशाळा आज घेतोय असे गौरवोद्गार काढले.
सदरील कार्यशाळेत तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांनी उत्साहाने व हिरीरीने सहभाग घेतला. याप्रसंगी निवासी नायब तहसिलदार अनिल ठोंबरे उपस्थित होते.