स्थानिक

बारामतीत शुक्रवारी रंगणार विचारांचा जागर; सुप्रसिद्ध कवी-व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान

कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा

बारामतीत शुक्रवारी रंगणार विचारांचा जागर; सुप्रसिद्ध कवी-व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान

कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि व्याख्याते नितीन चंदनशिवे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन बारामती शहरातील महात्मा फुले नगर, आमराई येथे करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

कालकथित झुंबरलाल अहिवळे, नानुबाई अहिवळे आणि उषाताई अहिवळे यांच्या संयुक्त स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मानव एकता युवक संघटना, शेरसुहास मित्र मंडळ आणि भारतदादा अहिवळे युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.

नितीन चंदनशिवे हे आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीतून सध्याचे ज्वलंत सामाजिक प्रश्न, समाजप्रबोधन आणि सकारात्मक विचार मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाची बारामतीकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

📍 स्थळ : महात्मा फुले नगर, आमराई, बारामती
📅 दिनांक : शुक्रवार, ४ सप्टेंबर
⏰ वेळ : सायंकाळी ७ वाजता

Back to top button