बारामतीत शेरसुहास मित्र मंडळाकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी
मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामतीत शेरसुहास मित्र मंडळाकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी
मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
बारामतीतील आमराई परिसरा मधील महात्मा फुले नगर या ठिकाणी शेरसुहास मित्र मंडळ,भारतदादा अहिवळे युवाशक्ती आणि परिसरातील बौद्ध बांधवांकडून पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण दूषित होत असताना.समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक सलोखा कायम ठेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या उद्देशाने या इफ्तार पार्टीचे आयोजन केले असल्याचे यावेळी ॲड.सुशिल अहिवळे आणि शुभम अहिवळे यांनी सांगितले.
दरम्यान,या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक,माजी उपनगराध्यक्ष भारतदादा अहिवळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,ॲड.अब्दुलकरीम बागवान,शब्बीर शेख,तैनुर शेख,असिफ खान,अल्ताफ बागवान,बसपाचे नेते काळुराम चौधरी,बामसेफचे जिल्हाध्यक्ष आनंद थोरात,प्रा.अरुण कांबळे,नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे,मन्सूर शेख,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे गौतम शिंदे,विश्वास लोंढे,गजानन गायकवाड,प्रा.रमेश मोरे,सचिन जगता. यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य रणधीर चव्हाण,नितीन गव्हाळे,रफिक शेख,बिलाल बागवान,विजय मागाडे,सिद्धार्थ लोंढे,हर्षद रणदिवे,विजय लोंढे,शेखर अहिवळे,बॉबी पाथरकर,दिवेश अहिवळे,अनिकेत थोरात,रितेश गायकवाड,गणेश पाठक,प्रविण जगताप,आदित्य मागाडे यांनी परिश्रम घेतले.