बारामतीत संविधान दिनी सचिन सातव यांनी केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
संविधानाचं वाचन करण्यात आलं.

बारामतीत संविधान दिनी सचिन सातव यांनी केलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
संविधानाचं वाचन करण्यात आलं.
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये संविधानाचं वाचन करण्यात आलं. तसेच सामूहिक शपथ आणि प्रार्थनेचा कार्यक्रमही पार पडला. याप्रसंगी सचिन सातव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत आहेत. हीच परंपरा कायम ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगून सचिन सातव यांनी संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जोपासणा करत कार्यरत राहू अशी ग्वाही दिली.






