राजकीय

बारामतीत सचिन सातव यांचा प्रचाराचा अनोखा फंडा; पहाटेपासूनच प्रचार दौरा सुरू करत घेतल्या सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी..!

पहाटे ६ वाजताच आपल्या भेटीगाठी सुरू

बारामतीत सचिन सातव यांचा प्रचाराचा अनोखा फंडा; पहाटेपासूनच प्रचार दौरा सुरू करत घेतल्या सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी..!

पहाटे ६ वाजताच आपल्या भेटीगाठी सुरू

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी प्रचाराचा अनोखा फंडा वापरला आहे. समाजातील तळागाळातील घटकांशी संपर्क साधत त्यांनी आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं आहे. आज त्यांनी भल्या पहाटेच बारामती सायकल क्लब, डब्ल्यूटीएफ या संस्थेच्या सदस्यांबरोबरच विद्यानगरी येथील नक्षत्र उद्यानात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असतानाच नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळं बारामतीत नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर सचिन सातव यांनी पहाटे ६ वाजताच आपल्या भेटीगाठी सुरू केल्या.
बारामतीत सायकल चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बारामती सायकल क्लबच्या सदस्यांची सचिन सातव यांनी भेट घेत त्यांची संवाद साधला. तसेच डब्ल्यूटीएफ ग्रूपच्या सदस्यांचीही त्यांनी आवर्जून भेट घेतली.

बारामतीकरांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध संस्था प्रयत्न करत आहेत. त्यांना आवश्यक सुविधा अजितदादांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जात आहेत. यात अधिक भर पडावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सचिन सातव यांनी यावेळी दिली.

दरम्यान, त्यांनी विद्यानगरी येथील नक्षत्र उद्यानात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत ते राहत असलेल्या प्रभागात झालेली कामे, अडचणी आणि समस्या याबद्दल चर्चा केली. अजितदादांच्या रूपाने विकासप्रिय नेतृत्व बारामतीकरांना लाभले आहे. त्यांच्या माध्यमातून बारामतीचा लौकीक वाढेल अशा पद्धतीचं काम करून दाखवण्याचा आपला मानस असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी दिलं..

Back to top button