स्थानिक

बारामतीत साधेपणात पार पडली रामनवमीची शोभायात्रा; अजितदादा पवार यांच्या निधनाची छाया

शहरात रामनवमी निमित्त उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

बारामतीत साधेपणात पार पडली रामनवमीची शोभायात्रा; अजितदादा पवार यांच्या निधनाची छाया

शहरात रामनवमी निमित्त उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

बारामती वार्तापत्र 

सालाबादप्रमाणे रामनवमी उत्सव समिती, बारामती यांच्या वतीने रामनवमी निमित्त २६ मार्च २०२६ रोजी शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माननीय अजितदादा पवार यांच्या दुःखद व दुर्दैवी निधनामुळे यावर्षीची शोभायात्रा अत्यंत साध्या व पारंपरिक पद्धतीने काढण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.

त्याअनुषंगाने यंदा शोभायात्रा पारंपरिक पालखी सोहळ्याच्या स्वरूपात आयोजित करण्यात आली. मराठा नगर येथून प्रभू श्रीरामांच्या पालखीचे प्रस्थान संध्याकाळी ठीक ७ वाजता झाले. यावेळी श्री व सौ. सागर माकणकर यांच्या हस्ते श्रीरामांची आरती करून पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

ही पालखी आप्पासाहेब पवार मार्ग, गुणवडी चौक मार्गे श्रीराम मंदिर, राम गल्ली येथे पोहोचली. येथे उपविभागीय दंडाधिकारी श्री वैभव नावडकर व नगराध्यक्ष श्री सचिन शेठ सातव यांच्या हस्ते पालखीचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होत गांधी चौक, सुभाष चौक, भिगवन चौक, इंदापूर चौक मार्गे पुन्हा गुणवडी चौक येथे दाखल झाली.

मारुती मंदिरात पोलीस उपनिरीक्षक श्री भंडारे व पोलीस उपनिरीक्षक श्री राऊत यांच्या हस्ते मारुतीरायाची आरती करण्यात आली. यानंतर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

यंदा शोभायात्रा साध्या पद्धतीने काढण्यात आली असली तरी बारामती शहरात रामनवमी निमित्त उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. या शोभायात्रेचे आयोजन रामनवमी उत्सव समिती, बारामती यांच्या वतीने करण्यात आले होते.

Back to top button