बारामतीत सुशोभीकरणासाठी बेकायदेशीरपणे वृक्ष तोड ! वृक्ष प्रेमींकडून संताप व्यक्त
प्रशासन कारवाई करणार का?
बारामतीत सुशोभीकरणासाठी बेकायदेशीरपणे वृक्ष तोड ! वृक्ष प्रेमींकडून संताप व्यक्त
प्रशासन कारवाई करणार का?
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार हे “झाडे लावा आणि झाडे वाचवा” अशा सूचना वारंवार देत असताना त्यांच्याच बारामतीत काहीजण आपल्या पदाचा गैरवापर करीत झाड रात्रीच्या वेळी तोडून कत्तल करत आहेत. बारामती शहरातील पंचायत समिती इमारतीच्या समोर असलेले तीस वर्षांपूर्वीचे जांभळीचे भलेमोठे झाड हे काल रात्री कुठलीही परवानगी न घेता कटरच्या आणि ट्रॅकटरच्या सहाय्याने तोडण्यात आलेय.
विशेष म्हणजे या झाडाची वाहतुकीला कुठलीही अडचण होत नसताना देखील हे झाड का तोडण्यात आले याची चर्चा बारामती तालुक्यात रंगली आहे.
या झाडाखाली अनेक नागरिक हे आपली दुचाकी लावून सावलीचा आधार घेत होते सध्या उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांना झाडाच्या सावलीचा आधार असतो मात्र कुठलीही परवानगी न घेता जांभळी चे झाड बेकायदेशीरपणे तोडुन त्याची कत्तल करण्यात आली आहे.
यामुळे नागरिकाकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आता बारामती नगर पालिकेचे अधिकारी नेमकी झाड तोडणार्यावर काय कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे..