बारामतीत होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अमित भापकर यांची निवड
२०२६ साठी डॉ. अमित गोरख भापकर यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

बारामतीत होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अमित भापकर यांची निवड
२०२६ साठी डॉ. अमित गोरख भापकर यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड
बारामती वार्तापत्र
जागतिक होमिओपॅथी दिन आणि डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी २०२६ साठी डॉ. अमित गोरख भापकर यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला बारामतीचे नगराध्यक्ष . सचिन सातव ,नगरसेवक अमोल कावळे, राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ सचिन बालगुडे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
अध्यक्ष – डॉ. अमित गोरख भापकर, उपाध्यक्ष –
डॉ. जीवन कोकरे
डॉ. सचिन लोणकर
डॉ. प्रज्ञा इंगळे, सचिव – डॉ. पृथ्वीराज झांबरे, सह सचिव – डॉ. प्रद्नेश नायगावकर,खजिनदार –
डॉ. सागर साळुंखे
डॉ. लोकेश छाजेड, सांस्कृतिक सचिव – डॉ. साक्षी बर्गे, क्रीडा सचिव – डॉ. रुपेश माने
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करत असताना या क्षेत्रातील डॉक्टरांच्या समस्या सरकारी दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे निवडीनंतर डॉ अमित भापकर यांनी सांगितले.






