बारामतीत २ व ३ नोव्हेंबर रोजी “शारदोत्सव” महोत्सवाचे आयोजन
यावर्षीही पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने २ व ३ नोव्हेंबर रोजी ‘शारदोत्सव’ महोत्सवाचे आयोजन
बारामतीत २ व ३ नोव्हेंबर रोजी “शारदोत्सव” महोत्सवाचे आयोजन
यावर्षीही पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने २ व ३ नोव्हेंबर रोजी ‘शारदोत्सव’ महोत्सवाचे आयोजन
बारामती वार्तापत्र
भारतीय कला संस्कृती म्हणजे जगभरातील संस्कृतीमधील एक प्राचीन आणि सर्वश्रेष्ठ अविष्कार अभिजात संगीत परंपरा हा भारतीय कला संस्कृतीचा एक लक्षणीय विशेष आहे. या अभिजात संगिताची ओढ आजही वाढावी गावोगावी तिला रसिकाश्रय लाभावा या हेतुने दर वर्षी बारामतीत “शारदोत्सवाचे आयोजन” करण्यात येत असते. गत वर्षी देखील बारामतीत पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने २ व ३ नोव्हेंबर रोजी “शारदोत्सव” मोहत्सवाचे आयोजन गदिमा सभागृह विद्यानगरी बारामती येथे करण्यात आले आहे.
बारामतीतील गदिमा सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात २ नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक पद्मश्री वेंकटेश कुमार यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम असणार आहे. तर ३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्या आशा भोसले यांना संगितमय मानवंदना देणारा ‘शतकाची आश’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात गायक हृषीकेश रानडे, प्रथमेश लघाटे, शल्मली सुखटणकर, आनंदी जोशी, कृतिका बोरकर, शरयु दाते आणि इतर कलाकार सहभाग घेणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी या करणार आहेत.
२ व ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला असुन कोव्हीडचे नियम पाळुन शासकिय नियमानुसार आसन व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान या दोन्ही कार्यक्रमांचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.