क्राईम रिपोर्ट

बारामतीत ५२ हजाराचा गुटखा जप्त

एकजण गजाआड : बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.

बारामतीत ५२ हजाराचा गुटखा जप्त

एकजण गजाआड : बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.

बारामती वार्तापत्र

बारामतीत गुटखा विक्री प्रकरणी हिरालाल हसन बागवान (वय ५२ वर्ष) (रा:देसाई इस्टेट) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी छाप्यामध्ये गुलाम ,विमल, चौकीदार ,आर एम बी, जाफरानी, व्ही १, गोवा १०००,पान पराग एक्स्ट्रा, पान मसाला विविध ब्रँडचे साठ रुपये पुडा ते चारशे रुपये पुडा एमआरपी असलेले विविध ब्रँडचे एकूण ४०२ पुडे असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुनावाला गार्डन समोर महात्मा फुले लघु केंद्रांमधील गाळा नंबर ८५ मध्ये विविध ब्रँडचा गुटखा ,सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्रीसाठी ठेवलेला आहे. व लोक त्या ठिकाणावरून किरकोळ विक्रीसाठी गुटका घेऊन जात आहेत. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे यांना गोपनीय बातमी दारामार्फत मिळाली.

बातमी मिळताच दोन पंचांसमक्ष त्या ठिकाणी बारामती शहर पोलिसांनी छापा मारला छाप्यामध्ये गुलाम ,विमल, चौकीदार ,आर एम बी, जाफरानी, V 1, गोवा १०००,पान पराग एक्स्ट्रा, पान मसाला विविध ब्रँडचे साठ रुपये पुडा ते ४०० रुपये पुडा एमआरपी असलेले विविध ब्रँडचे एकूण ४०२ पुडे त्या ठिकाणी विक्री करताना मिळून आले. याठिकाणी घेण्यासाठी आलेले दोन ग्राहक पळून गेले.

सदर जप्त केलेल्या गुटका व तंबाखू व पान मसाल्याची एकूण बाजारातील एमआरपी किंमत ५२ हजार रुपये आहे. या ठिकाणावरून पोलिसांनी हिरालाल हसन बागवान (रा देसाई इस्टेट) यांना त्या ठिकाणावरुन विक्री करत असताना मिळून आल्याने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून बारामती शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३२८,२७२ तसेच अन्न सुरक्षा अधिनियम आचे विविध कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पोलीस हवालदार अभिजीत कांबळे. पोलीस नाईक दशरथ कोळेकर. पोलीस नाईक कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण ,राऊत यांनी केलेली आहे

Related Articles

Back to top button