कोरोंना विशेष

बारामतीत 100 खाटांचे कोविड केअर हॉस्पिटल टाटा ट्रस्ट उभारून देणार.

कोरोनाशी दोन हात करण्याच्या उद्देशाने टाटा ट्रस्ट बारामतीकरांच्या पाठीशी उभा ठाकणार आहे.

बारामतीत 100 खाटांचे कोविड केअर हॉस्पिटल टाटा ट्रस्ट उभारून देणार.

कोरोनाशी दोन हात करण्याच्या उद्देशाने टाटा ट्रस्ट बारामतीकरांच्या पाठीशी उभा ठाकणार आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती एमआयडीसीतील शासकीय महिला रुग्णालयाशेजारी असलेल्या नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीत हे कोविड केअर हॉस्पिटल उभारले जाणार आहे.या प्रस्तावित हॉस्पिटलमध्ये 75 बेडसना ऑक्सिजनची सुविधा तर 25 बेडला व्हेंटीलेटर्सची सुविधा उपलब्ध होणार आहे.असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. त्याचा हा व्हिडीओ पहा.

या मध्ये रुग्णविभाग, तपासणी, जनरल केअर, प्रयोगशाळा, स्क्रिनिंग व प्रोसिजर रुम, यात प्रत्येक बेडला मेडीकेशन ड्रॉवर, ओव्हरबेड टेबल, आयव्ही स्टँड, सर्व बेड मेडीकल ऑक्सिजन पाईपलाईनने परस्परांशी जोडलेले असतील. मोबाईल एक्स रे तसेच अल्ट्रासोनोग्राफी मशीन, हिमॅटोलॉजी अँनेलायझर, सिरींज व इनफ्युजन पंप, व्हिडीओ लॅप्रोस्कोप, वॉर्ड नर्सिंग स्टेशन, ईसीजी, पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, शुगर लेव्हल मॉनिटर, इन्फ्रारेड थर्मोमीटर, स्टीम स्टरलायझर, अल्ट्रासॉनिक क्लिनर्स, रक्त साठवण सुविधा यासह अनेक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

Related Articles

Back to top button