बारामतीत 19 ऑक्टोबर देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौर्यावर, तीन जिल्ह्यांना भेट देणार!
या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास फडणवीस करणार आहेत.
बारामतीत 19 ऑक्टोबर देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौर्यावर, तीन जिल्ह्यांना भेट देणार!
या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास फडणवीस करणार आहेत.
बारामती वार्तापत्र
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दि.19 ऑक्टोबर पासुन बारामतीतून सुरूवात करणार आहे. तीन दिवसात ते तीन जिल्ह्यांना भेट देणार आहेत.
राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील.
कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परांडा इ.ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होणार आहेत. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्या दिवशी म्हणजे मंगळवार दि.20ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्या दिवशी म्हणजे बुधवारी दि.21ऑक्टोबरला हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास फडणवीस करणार आहेत.