बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय महिला परिषदेचे यशस्वी आयोजन
महाविद्यालयील विद्यार्थ्यांच्या पोस्टर प्रेझेंटेशन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय महिला परिषदेचे यशस्वी आयोजन
महाविद्यालयील विद्यार्थ्यांच्या पोस्टर प्रेझेंटेशन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय महिला परिषद नुकतीच पार पडली. ‘आजची स्त्री- आजची सावित्री’ या विषयावर ही राष्ट्रीय महिला परिषद आधारलेली होती.
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने ही परिषद आय़ोजित करण्यात आली होती. दोन दिवसीय परिषदेसाठी सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी, अभ्यासकांनी सहभाग नोंदवला तर 60 संशोधन पेपर जमा झाले.
राष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रम दिनांक 9 मार्चरोजी संपन्न झाला. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका संध्या नरे- पवार उपस्थित होत्या तर अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी अध्यक्षस्थान भुषविले. प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रीय महिला परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय महिला परिषदेच्या संजोयिका डॉ. सीमा नाईक गोसावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. श्रीमती सुषमा संगई यांनी परिचय करून दिला.
अध्यक्षीय भाषणामध्ये जवाहर शाह वाघोलीकर यांनी महिलांचे कर्तृत्वाचा परिघ राजकारणापासून ते संरक्षण क्षेत्रापर्यत वाढला असल्याचं सांगत महिलांच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्या लेखिका संध्या नरे- पवार यांनी स्वप्न पाहणा-या मुली असतील तरच पुढील वाटचालीसाठी बळ मिळेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयील विद्यार्थ्यांच्या पोस्टर प्रेझेंटेशन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीमती सुषमा संगई सहसमन्व्यक यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले दोन दिवसांच्या परिषदेमध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिला परिषदेच्या पहिल्या दिवशी सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे यांनी शेती करणा-या महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले, सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी स्त्रीच्या श्रमाची जाणीव झाली पहिजे असे मत व्यक्त केले.
संध्या नरे- पवार महिलांच्या आत्मसन्मानावर भाष्य केले. दुस-या दिवशी ऍड. साधना खाती यांनी महिलांविषयीच्या कायद्यांची माहिती उपस्थितांना दिली. ज्येष्ठ दिर्गदर्शक सुनील सुकथनकर यांनी दुरचित्रवाणीवरील कार्यक्रमामध्ये महिलांचे चित्रण या विषयावर मत व्यक्त केले.
ऍड. प्रिया गुजर कोरोना काळात महिलांवर पडलेला ताण या विषयावर प्रकाश टाकला. शेवटच्या सत्रामध्ये लता करे यांच्या
अनुभवकथनाचा कार्यक्रम शेवटच्या सत्रामध्ये पार पडला. महाविद्यालयातील अभ्यासकांच्या शोधनिबंधांचे वाचण यावेळी करण्यात आले.
राष्ट्रीय महिला परिषदेच्या समारोप समारंभाचा कार्यक्रम टीसी कॉलेजच्या जीवराज सभागृहामध्ये पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.योगीनी मुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. राष्ट्रीय महिला परिषदेच्या
संयोजिका डॉ.सीमा नाईक गोसावी यांनी दोन दिवसीय परिषदेचा आढावा घेतला. तर सुषमा संघई यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. बडवे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.