बारामतीमधील श्रायबर डायनामिक्स कंपनीत आयकर विभागाची कारवाई चौथ्या दिवशीही चौकशी सुरूच!
कंपनीच्या मुख्य गेटवर बंदूकधारी सीआरपीएफचे जवान तैनात

बारामतीमधील श्रायबर डायनामिक्स कंपनीत आयकर विभागाची कारवाई चौथ्या दिवशीही चौकशी सुरूच!
कंपनीच्या मुख्य गेटवर बंदूकधारी सीआरपीएफचे जवान तैनात
बारामती वार्तापत्र
बारामतीमधील श्रायबर डायनामिक्स कंपनीत आयकर विभागाची कारवाई सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय आणि नातेवाईकांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई सुरूच असल्याचे अद्यापही बोलले जात आहे. दरम्यान, बारामतीमधील श्रायबर डायनामिक्स कंपनीत आयकर विभागाची कारवाई सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुरुवारी अजित पवार यांच्या नातेवाईक आणि निकटवर्तीय व्यक्तीवर प्राप्तीकर विभागाने छापेमारी करण्यास सुरुवात केली. ती अद्यापही सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, बारामतीमधील श्रायबर डायनामिक्स कंपनीत गुरुवारी प्राप्तिकर विभागाचे पथक आत गेले असून ते अद्यापही चौकशी करत असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. कंपनीच्या मुख्य गेटवर बंदूकधारी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले असून पत्रकारांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर, आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर असून त्यांनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नसून प्राप्तिकरची कारवाई पूर्ण झाल्यास ते काही बोलणार का? याकडे सर्व राजकीय व्यक्तीचे डोळे लागलेले आहेत.