बॅलन्स असणारे एटीएम युवकांनी केले परत तरुणाचे सर्व स्तरातून कौतुक
नागरिकांनी आपल्या एटीएम, व बँक कागदपत्राची खबरदारी घ्यावी

बॅलन्स असणारे एटीएम युवकांनी केले परत तरुणाचे सर्व स्तरातून कौतुक
नागरिकांनी आपल्या एटीएम, व बँक कागदपत्राची खबरदारी घ्यावी
बारामती वार्तापत्र
समाजात अनेक गुन्हेगार असले तरी आणि आधुनिक युगात कितीही नियत बदलली असे म्हटले तरी रावणाच्या लंकेत ज्याप्रमाणे बिभीषण होता त्याप्रमाणे आजही समाजामध्ये अनेक चांगली व प्रामाणिक माणसे आहेत याचा प्रत्यय आज बारामतीत आला.
याविषयी हकीकत अशी की बारामती येथील गुलाबराव महादेव ढेंबरे वय 49 हे प्रगती मेडिकल शेजारी कापडाचा व्यवसाय करतात. दैनंदिन व्यवसायातून चार पैसे मिळवून आपल्या कुटुंबासाठी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ते कापडाचा व्यवसाय करतात. त्यांच्या मुलीकडे कॉसमॉस बँकेचे एटीएम होते त्या एटीएम कार्ड च्या पॉकेटमध्ये एटीएम सह पैसे काढण्यासाठी असलेला पिन नंबर व मोबाईल नंबर लिहिलेला होता तेच एटीएम पॉकेट सह बारामती पंचायत समितीच्या परिसरात हरवले तशी तक्रार त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला दिली होती. मात्र संध्याकाळी केदार देवानंद पाटोळे वय 27 या ॲटो चालकाला व त्याच्या मित्राला हे एटीएम पिन सह सापडले.त्यांनी त्या मोबाईलवर ढेंबरे यांना संपर्क साधून ,बारामती शहर पोलीस स्टेशनला गेले त्या ठिकाणी पोलिसांनी रात्री अकरा वाजता ढेंबरे यांना पोलीस स्टेशनमध्ये मध्ये बोलावून पिन नंबर व एटीएम ढेंबरे यांच्या स्वाधीन केले. या एटीएम मध्ये 18000 रुपये शिल्लक होती. मात्र या तरुणांनी जसेच्या तसे एटीएम पोलिसांच्या स्वाधीन केले त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या तरुणांना ढेंबरे यांनी थंडीत वापरण्यासाठी स्वेटर भेट दिली व या तरुणांनी हरवलेली वस्तु सापडल्यावर ती ज्याची त्यांना देणे हे आमचे कर्तव्यच आहे. असे उद्गार काढले.
नागरिकांनी आपल्या एटीएम, व बँक कागदपत्राची खबरदारी घ्यावी एटीएम च्या पॉकेटमध्ये पिन नंबर अजिबात लिहू नये अन्यथा आपले आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या तरुणांनी केलेले कार्य निश्चितच तरुण पिढीला मार्गदर्शक व दिशा देणारे आहे.
श्री नामदेवराव शिंदे ,पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन






