कोरोंना विशेष
बारामतीमध्ये प्रसिद्ध व्यापाऱ्याचा कोरोनाने अंत.
पुणे येथील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.
बारामती मधील प्रसिद्ध व्यापाऱ्याचा कोरोनाने अंत.
पुणे येथील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.
बारामती;वार्तापत्र
बारामती शहरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्यानी आज पुणे येथील खासगी रुग्णालयांमध्ये दुपारी 3 वाजून 30 मिनीटांनी अखेरचा श्वास घेतला.
बारामती येथील अशोकनगर येथे राहणाऱ्या या पती पत्नीस कोरोनाची लागण झाली होती.दरम्यान पत्नीस बारामती हॉस्पिटलमध्ये तर पतीस पुणे येथे पुढील उपचार साठी ऍडमिट केले होते. परंतु उपचारा अंती त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी आज पुणे येथे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्यापश्चात पत्नी,मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
बारामती मधील आतापर्यंत एकूण 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.