बारामतीत तब्बल ८४९७ लिटर भेसळयुक्त दुध पकडले…
दूध येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती
बारामतीत तब्बल ८४९७ लिटर भेसळयुक्त दुध पकडले…
दूध येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती
बारामती वार्तापत्र
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्रातून बारामती येथे आलेले भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. तब्बल २ लाख २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त गाईचे दूध पुण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाची कारवाई करत जप्त केले आहे.
जामखेड येथून टॅँकर (एम.एच ११/ए.एल ५९६२) मधून सुमारे ८ हजार लिटर भेसळयुक्त दूध येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. परिमंडळ ५ चे सहायक आयुक्त (अन्न) अजुर्र्न भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी अंकुश, बालाजी शिंदे आणि पुणे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास मंडळाचे राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने बारामती येथे जाऊन छापा टाकून कारवाई केली.
दरम्यान, जामखेड येथून टँकरमधून ( MH.11/ L. 5962) जवळपास 8 हजार लिटर भेसळयुक्त दूध येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. पथकातील अधिकाऱ्यांनी दुधाची तपासणी केली. या तपासणीत भेसळयुक्त आणि कमी दर्जाचे दूध असल्याचे निदान झाले. बारामतीमध्ये भेसळयुक्त दूध जप्त करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली आहे.