बारामतीमध्ये महिला टी-20 स्पर्धेचे आयोजन; आमदार रोहित पवारांच्या हस्ते उद्घाटन
पहिल्या सामन्यात पीडिसीए तर दुसऱ्या सामन्यात पीवायसीची विजयी सलामी
बारामतीमध्ये महिला टी-20 स्पर्धेचे आयोजन; आमदार रोहित पवारांच्या हस्ते उद्घाटन
पहिल्या सामन्यात पीडिसीए तर दुसऱ्या सामन्यात पीवायसीची विजयी सलामी
बारामती वार्तापत्र
पीडीसीए आणि पीवायसी हिंदू जिमखाना अँकॅडमी या संघांनी महिला प्रिमीयर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.
धीरज जाधव क्रिकेट अँकॅडमीने बारामतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित केलेली स्पर्धा गुरुवारपासून सुरु झाली. उद्घाटनाच्या सामन्यात कर्णधार पार्वती बाकळे हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पीडीसीए (पुणे जिल्हा क्रिकेट संघटना) संघाने सारा क्रिकेट अँकॅडमी
संघाचे कडवे आव्हान तीन चेंडू राखून परतावून लावले. साराने 5 बाद 134 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती.
पार्वतीने स्वाती शिंदे आणि श्रुती भांबुर्डेकर यांना प्रत्येकी दोन चौकार मारले आणि विजय आवाक्यात आणला. साराच्या श्रुती भांबुर्डेकरने सलामीला येत नाबाद अर्धशतकी खेळी करीत लक्षवेधी कामगिरी नोंदविली.
दुसऱ्या सामन्यात पीवायसीने श्री स्वामी समर्थ क्रिकेट अँकॅडमीवर
आठ राखून दणदणीत विजय मिळविला. स्वामी समर्थ अँकॅडमीचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय अपयशी ठरला. अखेरच्या षटकापूर्वी त्यांचा डाव 72 धावांत आटोपला. गोलंदाज स्वाती शिंत्रे हिने 14 धावांत चार विकेट घेतल्या. पीवायसीकडून मनाली कुलकर्णी-प्रगती धावडे यांनी 59 धावांची सलामी देत विजय औपचारीक ठरविला.
त्याआधी आमदार रोहित पवार यांच्याहस्ते आणि बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिक्षक नारायण शिरगावकर यांच्या मुख्य उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.
रोहित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नेते शरद पवार यांच्या प्रेरणेतून हे स्टेडियम उभारण्यात आले असून त्याच्या विकासासाठी आदरणीय नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढाकार घेत आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या क्लबमध्ये गुणी खेळाडूंना लवकर संधी मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी उच्च दर्जाची सुविधा आणि अनुभवी खेळाडूचे मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे असते. त्यासाठी धीरज जाधव यांनी पुढाकार घेतला आणि त्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो.
माजी रणजीपटू धीरज जाधव यांनी सांगितले की, लॉकडाउनमुळे सर्वच क्रीडापटूंना फटका बसला. त्यांना स्पर्धात्मक पातळीवरील खेळाला मुकावे लागले. आता परिस्थिती हळूहळू पुर्ववत होत असताना विविध वयोगटांमधील स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आम्ही अँकॅडमीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. महिलांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामने मुळातच कमी होत असताना अशी स्पर्धा आयोजित करणे विलक्षण समाधान देणारे आहे.
औपचारीक उद्घाटनापूर्वी रोहित पवार यांनी पॅड बांधून टोलेबाजी करीत क्रिकेटचा आनंद लुटला. त्यावेळी सहभागी महिला खेळाडूंनी त्यांना गोलंदाजी केली. त्यावेळी रोहित दादांचे फुटवर्क उपस्थितांना थक्क करणारे ठरले.
या स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी बारामतीकरांची पहिल्या दिवसाची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
स्पर्धेत — संघांचा सहभाग असून त्यात पूनम राऊत, मोना मेश्राम, अनुजा पाटील अशा भारतीय महिला संघाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.
संक्षिप्त धावफलक
सामना क्रमांक 1
सारा क्रिकेट अँकॅडमी :- 20 षटकांत 5 बाद 134 (दामिनि बनकर 30-30 चेंडू, 5 चौकार, श्रुती भांबुर्डेकर नाबाद 52-52 चेंडू, 5 चौकार, संस्कृती बढे 17-2, पार्वती बाकळे 20-2) पराभूत विरुद्ध पुणे जिल्हा क्रिकेट संघटना (पीडीसीए) :-19.3 षटकांत 6 बाद 135 (अमृता निकम 35-51 चेंडू, 4 चौकार, शरयू कुलकर्णी 29-30 चेंडू, 3 चौकार, पार्वती बाकळे नाबाद 23-17 चेंडू, 4 चौकार, मैथिली गंजाले 22-2, श्रुती भांबुर्डेकर 31-2)
निकाल :- पीडीसीए चार विकेट, तीन चेंडू राखून विजयी
वूमन ऑफ द मॅच :-पार्वती बाकळे
सामना क्रमांक 2
श्री स्वामी समर्थ क्रिकेट अँकॅडमी :- 19 षटकांत सर्वबाद 72 (भैरवी गवळी 12, ज्ञानदा निकुम 21-38 चेंडू, 2 चौकार, सानिया पावगी 12-2, श्रावणी शिंत्रे 14-4) पराभूत विरुद्ध पीवायसी हिंदू जिमखाना अँकॅडमी 12.1 षटकांत 2 बाद 73 (मनाली कुलकर्णी 24-28 चेंडू, 4 चौकार , प्रगती धावडे 40-42 चेंडू, 8 चौकार, आरती बुऱ्हाडे 8-2)
निकाल पीवायसी आठ विकेट आणि 7.5 षटके राखून विजयी
वूमन ऑफ द मॅच: – श्रावणी शिंत्रे