बारामतीमध्ये रामनवमी अभूतपूर्व उत्साहात संपन्न
शोभायात्रेचा समारोप गुनवडी चौक येथील मारुती मंदीरात आरती करुन करण्यात आला.
बारामतीमध्ये रामनवमी अभूतपूर्व उत्साहात संपन्न
शोभायात्रेचा समारोप गुनवडी चौक येथील मारुती मंदीरात आरती करुन करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरामध्ये श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे दरवर्षी श्रीरामजन्मानिमित्त भव्य शोभायात्रेचे नियोजन केले जाते , श्री राम जन्मोत्सव
समिती तर्फे सन २०१५ पासून भव्य शोभायात्रा काढली जाते शोभायात्रेचे यंदाचे सहावे वर्ष होते.
कोरोना काळात दोन वर्षाचा खंड पडल्यामुळे यावर्षीच्या शोभायात्रेमध्ये बारामतीकरांनी अभुतपूर्व संख्येने उपस्थिती लावली होती
शोभायात्रेची सुरूवात श्रीराम मंदीर,श्री. राम गल्ली येथे पालखीतील प्रभू श्रीरामाच्या आरतीने सुरुवात झाली शोभायात्रेमध्ये असंख्य रामभक्त भगवे फेटे घालून व भगवे झेंडे घेऊन सामील झाले होते . हलगि पथक, ढोलपथक व आतिशबाजी यांसह शोभायात्रा
काढण्यात आली शोभायात्रेतील १२ फुटी श्रीराममुर्तीचे नागरीकांनी ठिकठिकाणी पुष्पहार व पुष्पवृष्टीने स्वागत केले.
परीसरातील मंडळांनी उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन ठिकठिकाणी सरबत व पाण्याची सोय रामभक्तांसाठी करून दिली होती.
शोभायात्रेचा समारोप गुनवडी चौक येथील मारुती मंदीरात आरती करुन करण्यात आला.
शोभायात्रेला उपस्थित राम भक्तांचे आभार श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे अध्यक्ष संदिप जाधव , उपाध्यक्ष अजित यादव , व कार्याध्यक्ष सोहेल इनामदार यांनी मानले.