बारामतीसाठी रेमेडिसविर झाले मंजूर, पण कोणकोणत्या हाॅस्पिटल्स ला किती???
जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केलेल्या मंजुरी नुसार
बारामतीसाठी रेमेडिसविर झाले मंजूर, पण कोणकोणत्या हाॅस्पिटल्स ला किती???
जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केलेल्या मंजुरी नुसार
बारामती वार्तापत्र
बारामतीसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केलेल्या मंजुरी नुसार
बारामती मधील जगन्नाथ हॉस्पिटल मधील 34 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 18, शांताबाई देशपांडे हॉस्पिटल मधील 30 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 18, लाईफ लाईन हॉस्पिटल मधील 36 रुग्णसंख्या साठी 22, मेहता हॉस्पिटल साठी 16 क्षमतेकरता 10, ओमकार हॉस्पिटल मधील 6 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 4, भाग्यजय हॉस्पिटलच्या 25 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 14, शिवनंदन हॉस्पिटल मधील 19 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 11, देवकाते हॉस्पिटल मधील 16 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 10, गिरीराज हॉस्पिटल मधील 30 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 18 इंजेक्शनचा पुरवठा मंजूर करण्यात आला आहे.
पवार हॉस्पिटल मधील 10 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 6, क्रिटीकेअर हॉस्पिटल मधील 12 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 7, गोरड हॉस्पिटल मधील 30 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 18, लोंढे हॉस्पिटल मधील 4 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 2, सोमेश्वर आयसीयू हॉस्पिटल सोमेश्वर येथील 3 रुग्ण संख्या साठी 2, यशश्री हॉस्पिटल काटेवाडी मधील 25 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 14, आरोग्य हॉस्पिटल मधील 33 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 18, भगत हॉस्पिटल मधील 7 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 4, खोमणे हॉस्पिटल मधील 7 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 4 इंजेक्शनचा पुरवठा मंजूर करण्यात आला आहे.
चिंतामणी चेस्ट हॉस्पिटल मधील 5 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 3, सुखायु हॉस्पिटल मधील 5 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 3, चांदगुडे हॉस्पिटलमधील 25 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 14, साइ कोविड अँड आयसीयू हॉस्पिटल सांस्कृतिक भवन मधील 25 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 14, सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मोरगाव मधील 20 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 12 इंजेक्शन्स मंजूर करून ती वितरकांकडे पाठवण्यात आली आहेत.
दरम्यान या संदर्भात औषध प्रशासन विभागास ही इंजेक्शन्स औषधे योग्य प्रकारे विनियोग होत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश देखील दिले आहेत. भरारी पथकांनी या औषधांच्या वाटप व वितरणाबाबत खात्री करून अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन किंवा घाऊक विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करावी असे आदेश देखील दिले आहेत.